अतिष म्हात्रे
श्री सचिनदादा म्हणजेच आमचे मार्गदर्शक दादासाहेब..!!
स – समाजसेवेची आवड
निर्माण करणारे
चि – चिरतरुण विचारांची
पेरणी करणारे
न – नकारात्मक गोष्टींचा
समुळ नाश करणारे
दा – दातृत्वाचे महत्त्व शिकवणारे
दा – दास्यभक्तीची
ओळख देणारे
ध- धर्म, देश, देव यांंचे
महत्त्व सांगणारे
र्मा – सत्कर्माचा अट्टाहास
लावणारे
धि – धीर व आधार देणारा
मनुष्य रूपातील देव
का – कारुण्यसिंधु असे
री – ईश्वरी शक्तीची
ओळख देणारे
असे आमचे आदरणीय, तिर्थस्वरुप, रायगड भूषण, डॉ. श्री. सचिनदादा दत्तात्रेय तथा दादासाहेब धर्माधिकारी यांना आज वाढदिवशी मानाचा मुजरा व शिरसाष्टांग नमस्कार…
असंख्य माणसे निवृत्त झाल्यावर परमार्थ स्वीकारतात, परंतु लहानपणापासून परमार्थ करणे किती महत्वाचे आहे याची ओळख करून देणारे आमचे दादासाहेब…!
आम्हा तरुणांचे योग्य मार्गदर्शक म्हणजे दादासाहेब…!
अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे दादासाहेब…!
अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा म्हणजे दादासाहेब…!
एकदा संपर्कात आल्यावर त्यांच्या आयुष्याचे सोने करणारे दादासाहेब…!
ज्यांच्या मौखिक निरुपणामुळे प्रत्येकाला जगण्याची योग्य दिशा मिळते, असे माझे आदरणीय, देवतुल्य, डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम..!!
आपणांस उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
कोण आहेत तुमचे दादासाहेब? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु त्याचं उत्तर एका वाक्यात कधीच देता येणार नाही. कारण त्यांच्या कार्याची व्याप्ती एवढी प्रगल्भ आहे की त्यांना समजून घेणे व त्यांची ओळख करून घेणे अतिशय कठीण आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला तो अध्यात्मिक वारसा आहे. अनेक संतांनी आपल्या प्रासादिक वाणीने मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म, तसेच ईश्वराची ओळख आपल्या मौखिक निरुपणाने जनमानसात रुजविली. आपल्या ग्रंथ साहित्यातुन संतांनी याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला आहे. मात्र आतापर्यंत सगळ्या संताचे कार्य हे भारतापूरतेच मर्यादित राहिले.डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांनी हे कार्य डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत भारतात तसेच भारताबाहेर नेण्याचे अफाट कार्य केले आहे. श्रीमत दासबोध या पवित्र ग्रंथावर होणार्या निरुपणाच्या बैठका आज भारताबाहेर म्हणजेच अमेरिका, अबुधाबी, नॉर्वे, नायजेरिया, शारजा, दक्षिण आफ्रिका, दुबई, ऑस्ट्रेलिया येथे अखंड चालू आहेत. या कार्याची दखल म्हणून आत्ताच युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पॅरिस येथून श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना सर्वोच्च मानाची डॉक्टरेट मानद ही पदवी बहाल केली.
श्री दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी आरोग्य शिबीरे तसेच रक्तदान शिबिरे पार पडली गेली. त्यातील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये झाली आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचे कार्य कसे असते याची प्रत्यक्ष पहाणी या शिबिरात गिनीज बुकच्या वरिष्ठ अधिकार्यांनी स्वतः जातीने हजर राहून केली होती. टाईम मॅनेजमेंट तसेच इफेक्टिव्ह इव्हेंट मॅनेजमेंट कसे असावे हे आमच्या दादासाहेबांकडून शिकावे. मला माझ्या लहानपणापासूनच श्री समर्थ बैठकीच्या श्रवणाचा लाभ झाला आहे. योग्य वयात, योग्य सल्ला मिळत गेला. मला आयुष्याच्या खडतर वाटेवर, अगदी शून्यातून प्रवास करताना दादासाहेब नेहमीच मार्गदर्शक म्हणून लाभले. उरीीळशी र्ॠीळवरपलश, झशीीेपरश्रळीूं ऊर्शींशश्रेिाशपीं, णझडउ चझडउ र्ॠीळवरपलश, डारश्रश्र डलरश्रश र्इीीळपशीी, छशु र्इीीळपशीी ीींर्रीीीिं या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करताना श्री दादासाहेबांचे अफाट ज्ञान वाखाणण्याजोगे असते.
एखादा दगड योग्य कारागिराच्या हातात गेला तर त्याची उत्तम मूर्ती घडली जाते, तसंच माझ्यासारख्या अनेक जणांच्या आयुष्यात आमुलाग्र्र बदल झालेले आहेत. दैनंदिन जीवनात वावरत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात, मनाकडे सकारात्मक विचार प्रसूत होण्यासाठी काय करावे याची ओळख दादासाहेबांनी आपल्या मौखिक निरुपणातून अनेकांना दिली आहे. आपल्या प्रासादिक वाणीने तळागाळातील माणसांचे प्रबोधन करण्याचे कार्य दादासाहेब आजही करत आहेत.
मनुष्याला नित्य श्रवणाची अत्यंत गरज आहे यासाठी गावोगावी, खेड्यापाड्यात श्री समर्थ बैठका चालू करून प्रत्येकाला माणूस म्हणून कसे जगावे यासाठी दादासाहेबांचे आजोबा महाराष्ट्र भूषण, डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी आणि वडील पद्मश्री, डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्यात वेचले आणि तोच वसा आज डॉ. श्री. सचिनदादा पुढे चालवत आहेत.
ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या शरीराची स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे मनाची सुद्धा स्वच्छता झालीच पाहिजे. म्हणून श्रीबैठकीतून दादासाहेब मनाची स्वच्छता करून त्यावर नेहमी चांगल्या संस्काराची आणि उत्तम विचारांची पेरणी करतात. मनुष्य आधी आतून स्वच्छ झाला की बाहेरची स्वच्छता तो आपोआप करतो. म्हणूनच डॉ. आप्पासाहेब आणि डॉ. दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करून संपूर्ण भारतभर एकाच वेळी अनेक राज्यांत स्वच्छता अभियान घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडले आहे. अशी अनेक स्वच्छता अभियान ठिकठिकाणी घेऊन कित्येक टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. अनेक ठिकाणी येणारे पाण्याचे संकट ओळखून दादासाहेबांनी जलपुन:र्भरण, वृक्ष लागवड व संगोपन, विहिरी, तलाव, धरणे स्वच्छता मोहीम, इत्यादी अनेक उपक्रम तळागाळात राबविले व त्याचे महत्त्व पटवून दिले.
अध्यात्म आणि समाजकारण याची योग्य सांगड घालण्याचे उत्तम कार्य दादासाहेब करत आहे. हे कार्य अफाट आहे परंतु या कार्याचा कुठेही गवगवा केला जात नाही. धर्माधिकारी कुटुंबातील अनेक पिढ्या हे कार्य करत आहेत, परंतु नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणे यांनी पसंत केले आहे. नेहमीच नम्रता स्वीकारून आपले कार्य पुढे पुढे चालू ठेवले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच बँकॉक येथे मिळालेली डॉक्टरेट ही पदवी. ही पदवी स्वीकारण्यासाठी दादासाहेबांना पाचारण केलं तेव्हा ती सर्वोच्च पदवी स्वीकारण्यासाठी हात जोडून नम्रपणे तिथे उपस्थित राहिले. पदवी स्वीकारल्यानंतर लगेच ती पदवी आजोबा नानासाहेब व वडील आप्पासाहेब यांच्या चरणी समर्पित केली. एवढं आकाशाएवढं व्यक्तिमत्त्व असून सुद्धा किती ती नम्रता आणि शालिनता..!!
माणसाच्या आयुष्यात दुःख आणि कष्ट येण्याचे मूळ कारण म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याची योग्य ती ओळख न होणे. आपल्या पूर्ण आयुष्यात पैसा कमवणे हाच मूळ हेतू न ठेवता, खर्या देवाची ओळख करून घेणे आणि त्याने दिलेल्या मार्गावर चालत रहाणे हा होय. म्हणजेच, आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून परमार्थ कसा करावा याची ओळख दादासाहेबांनी दिली. याच शिकवणुकीमुळे आज कित्येक तरुणवर्ग पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा नोकरी, व्यवसाय करून परमार्थ करताना दिसत आहेत, मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये यशाची शिखरे पार करत आहेत. शिक्षण हा मनुष्याच्या भविष्यकाळाचा पाया आहे. शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहणे हे आपले कर्तव्य आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अभ्यास करून आपली प्रगती करावी हीच शिकवण दादासाहेबांनी दिली आहे. सातत्याने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत राहिलं पाहिजे. आपल्याकडे असलेल्या विद्येचा, शिक्षणाचा कधीही अहंकार करू नये. अहंकारामुळे त्या विद्येला महत्व राहत नाही.
विज्ञानाने अनेक नवनवीन शोध लावले आहेत. परिणामी अनेक आधुनिक उपकरणे प्रत्येक माणसाच्या हातात तसेच नित्य वापरात आली आहेत. आपण या सगळ्या गोष्टी वापराव्या परंतु त्याच्या आहारी जाऊ नये. लहान मुले व तरुणवर्ग मोबाईल आणि टीव्हीच्या जास्त प्रमाणात आहारी गेल्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर कसा वाईट परिणाम होतो, यातून कसे बाहेर पडावे याची ओळख श्री बैठकींमार्फत दिली जाते. आज माणसाचं आचरण बिघडलं आहे, परिणामी त्याला अनेक संकटांना, प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. आपल्या विचारांवर आणि संगतीवर आपलं आचरण अवलंबून असतं. आपण कितीही मोठे झालो तरी आपले संस्कार आणि उत्तम आचरण कधीही सोडू नये. याचीच ओळख दादासाहेब आपल्या निरुपणातून नेहमी देत असतात.
डॉ. श्री. सचिनदादा यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. त्यामध्ये महाआरोग्य शिबीर, वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबिर, बसस्थानक व निवारा शेड बांधणे, पाणपोई, गांडूळ खत प्रकल्प, तलाव, विहिरी, धरणे स्वच्छता मोहीम, निर्माल्या पासून गांडूळ खत तयार करणे, जलपुनर्भरण, शालेय साहित्य वाटप, कुरण व्यवस्थापन, शहर आणि ग्राम स्वछता अभियान, सरकारी कार्यालये व हॉस्पिटल स्वच्छता अभियान, समुद्र किनारे स्वच्छता अभियान, पूरग्रस्तांना मदत व पूर आलेल्या ठिकाणांची स्वच्छता, इत्यादी अनेक कार्य डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याचे विश्वस्त म्हणून डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी हे पार पाडत आहेत. नवनवीन उपक्रम ते नेहमी राबवत असतात.
पुन्हा एकदा, आपणांस वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम, आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!! आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लेख त्यांच्या चरणी समर्पित..