स्त्री रोग तपासणी शिबीर



| आगरदांडा | वार्ताहर |

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागा अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुरुड जंजिरा नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री रोग तपासणी शिबिराचे आयोजन (दि.25) सकाळी 9 वाजता मुरुड नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. स्त्रीरोग तज्ञ प्रियांका म्हात्रे वैद्यकीय अधिकारी डॉ.नेहा शेळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले उपस्थित राहुन स्त्री रोग तपासणीमध्ये रक्त तपासणी, शरीर चिकित्सा ,स्त्री चिकित्सा ,विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.

Exit mobile version