उद्या कृषीवलतर्फे खालापूरमध्ये हळदीकुंकू समारंभ

सोनी मराठी वाहिनीतील कलाकारांची प्रमुख उपस्थिती


| अलिबाग | प्रतिनिधी |

आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागाळातील घटकाला न्याय मिळवून देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कृषीवलच्यावतीने खालापूरमध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका यांच्या पुढाकाराने होणारा हा कार्यक्रम शनिवार (दि. 20) जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सात यावेळेत खालापूर फाटा मैदान, पेट्रोल पंपाजवळ येथे होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांची हळदीकुंकूची परंपरा कृषीवलने जपली आहे. यानिमित्ताने खालापूरमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यंदादेखील 20 जानेवारीला खालापूरमध्ये हळदीकुंकू समारंभ होणार आहे. या सोहळ्याला सोनी मराठी वाहिनीमधील ‌‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेतील अभिनेता राजवीर म्हणजेच अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री मयुरी म्हणजे जान्हवी तांबट तसेच ‌‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतील अभिनेत्री बयो म्हणजे विजया बाबर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या मालिकेतील सिनेतारका आणि नृत्याविष्कार आकर्षण ठरणार आहेत. यानिमित्ताने कलर मराठी ढोलकीच्या तालावर फेम महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी सोनाली पवार-वारकर यांचा नृत्याविष्कार सोहळा पहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version