हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपीचे पेण पोलीस ठाण्यातून पलायन

पोलिसांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डर चा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे. या घटनेमुळे पेण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बिरू गणेश महतो असे या आरोपीचे नाव आहे. तो पाबल कार्ली येथे एका पोकलनवर मदतनीस म्हणून कामाला होता.   पोकलन मशीन ऑपरेटर राजेंद्र चोलो यादाव वय ४२ वर्षे हा आरोपीत बिरू महतो याला पोलन मशीन ऑपरेट करताना तसेच जेवण बनविण्यावरून काहीना काही कारण काढुन त्रास देत असल्याने त्या गोष्टीचा मनात राग होता तो राग मनात धरून आरोपी बिरू गणेश महतो वय १९ वर्षे रा. वार्ड क्र ९, रा.वार्ड क्र ९ कडूरुखुटा, पो. पॅक, ता. नावडीहा, जि. बोकारो, राज्य झारखंड याने जखमी  राजेंद्र चोलो यादाव वय ४२ वर्षे याचे दोन्ही हाताचे पंजांवर, डोक्यावर, कपाळावर व चेह-यावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यास गंभीर दुखापती करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोकलन मालकाने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र  तो टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला. आणि पोलिसांचे लक्ष नसल्याचा फायदा घेवून त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. या प्रकारामुळे पेण पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस गाव गाव धुंडाळत आहेत. सदर प्रकरणाचा तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक शिद हे करीत आहेत.

Exit mobile version