बोर्लीपंचतनमध्ये अतिक्रमणावर हातोडा

प्रशासनाची कारवाई
। दिघी । प्रतिनिधी ।
दिघी-श्रीवर्धन तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे शहर असणार्‍या बोर्लीपंचतन परिसरात सर्व्हेबर हद्दीतील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर मंगळवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय कारवाईत प्रशासनाकडून हद्द कायम करत बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. मात्र, या कारवाईत अनेकांचा व्यवसाय बुडाला आहे.
या कारवाईत सुमारे 20 शेड व 15 अनधिकृत बांधकामे श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच भूमिअभिलेख आणि महसूल विभाग यांच्या निर्देशानुसार जेसीबीच्या सहायाने पाडण्यात आली. ही जमीन बांधकाम विभागाची मालकीची असून त्यावर अतिक्रमणे झालेली होती, या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रशासनाची मोठी कारवाई
तब्बल तीस वर्षानंतर अतिक्रमण विरोधात श्रीवर्धन प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये बोर्लीपंचतन क्षेत्रातील अतिक्रमण मोहीमेत ग्रामपंचायतचे सुलभ शौचालय सोबत अनेक बेकायदेशीर बांधकामे देखील हटवण्यात आले.

Exit mobile version