हमरापूरः शेकापच्या माध्यमातून विकास कामांचा शुभारंभ

| हमरापूर | प्रतिनिधी |

शेकापच्या माध्यमातून हमरापूर येथील अंतर्गत रस्त्याची कामे मंजूर झाली असून त्या कामांचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. या विभागात यापुढेही विकास कामे केली जातील, असे स्वर्गीय प्रमोद पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांनी पेण तालुक्यातील हमरापूर येथे बोलताना सांगितले.

हमरापूर येथील शशिकांत नागाजी पाटील ते जनार्दन पाटील यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता तसेच पंढरीनाथ पाटीत ते सतीश पाटील यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता, वसंत पाटील ते विजय सूर्वे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता या कामाचे भूमिपूजन तसेच कामाला सुरुवात स्मिता पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

या कार्यक्रमास स्मिता पाटील यांच्यासह माजी उपसभापती तैलेश पाटील, हमरापूर सरपंच राकेश दाभाडे, उपसरपंच संजय पाटील, सदस्य युवराज म्हात्रे, रविंद्र शेदवल, सुप्रिया पाटील, प्रतीक्षा चव्हाण, पायल सुर्वे, सुभाष दाभाडे, किशोर पाटील, सदाशिव पाटील, कृणाल पाटील, सतीश पाटील, अनिल पाटील, विनोद नाईक, संदेश कदम, सचिन पाटील, सचिन शेलार, संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version