| हमरापूर | प्रतिनिधी |
पेण तालुक्यांतील हमरापूर विभाग श्री गणेश मुर्तिकार उत्कर्ष मंडळाच्यावतीने संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हमरापूर विभाग ते पाली पायी पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. दरवर्षी ही पदयात्रा आयोजित केली जाते. त्याप्रमाणे यावर्षी देखिल ही पदयाञा जोहे गावातून निघाली. गणेश मुर्तीकारांचे प्रश्न लवकर सुटून प्लास्टर मुर्ती बनविण्यास कायम स्वरुपी परवानगी मिळू दे, असे साकडे आपण विघ्नहर्त्या बळालेश्वर बाप्पाला घातले असल्याचे मुर्तिकारांनी बोलताना सांगितले.
या पदयात्रेत महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, भाई मोकल, सतिश पाटील, राकेश दाभाडे, कृणाल पाटील, किरण दाभाडे, सचिन पाटील, देविदास नाईक, बाबू एनपुरे, जय पाटील, शंकर मोकल यांच्यासह विभागातील गणेश मुर्तिकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.