हांदा पद्धत शेतीसाठी लाभदायक

। खांब । वार्ताहर ।

भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. तर रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. असे जरी असले तरी दिवसेंदिवस शेती क्षेत्रावर येणारी संकटांची मालिका व वाढत्या महागाईमुळे शेती करणे परवडत नसल्याची शेतकरी वर्गाची भावना आहे.परंतु, आपला वडिलोपार्जित व्यवसाय टिकवून व त्यावर उपजीविका करणार्‍या शेतकऱी वर्गाची संख्याही मोठी असल्याने शेती परवडत नसली तरी सहकुटुंब व हांदा पद्धतीचा अवलंब करून शेती केली जात आहे.

हांदा पद्धतीत मजूरी न देता एकमेकांच्या शेतावर दिवसभर काम करायचे. ज्या शेतकर्‍याच्या शेतात जेवढे दिवस काम केले जाते तेवढे दिवस त्या शेतकर्‍याने पहिल्या शेतकर्‍याच्या शेतात काम करायचे. या पद्धतीला हांदा पद्धत असे म्हणतात. तर, या पद्धतीत कोणत्याही प्रकारची मजूरी द्यावी लागत नसल्याने ही पद्धती तर परवडतेच. याशिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही होत असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी संतोष कृष्णा भोईर यांनी याबाबत सांगितले.

Exit mobile version