हनुमान कोळीवाडा सरपंच पदावर टांगती तलवार ?

जेएनपीटी | वार्ताहर |
जनतेतून थेट निवडून आलेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद जयवंत कोळी यांनी सरकारी जागेत अनाधिकृत बांधकाम केल्याने त्या बांधकामाची चौकशी करून विद्यमान सरपंच परमानंद कोळी यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या सदस्यानी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्जाव्दारे केली आहे.त्यांची सूनावणी सोमवार दि 20 सप्टेंबर 2021 रोजी होणार असल्याने विद्यमान सरपंच परमानंद कोळी यांच्या सरपंच पदावर गटांतर येते की नाही अशी चर्चा उरणात रंगू लागली आहे.
 हनुमान कोळीवाडा े सरपंच परमानंद जयवंत कोळी यांनी सरकारी जागेत अनाधिकृत बांधकाम केले आहे.तरी त्या बांधकामाची चौकशी करून विद्यमान सरपंच परमानंद कोळी यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे अशी मागणी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्जाव्दारे केली आहे.सदर अर्जाची सूनावनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि 20 सप्टेंबर 2021 रोजी होणार असल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच परमानंद कोळी यांच्या सरपंच पदावर गटांतर येते की नाही अशी चर्चा सध्या उरणात राजकीय गोटात रंगू लागली आहे.

Exit mobile version