घोटवडेमध्ये हनुमान उत्सव जल्लोषात

शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी घेतले दर्शन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील घोटवडे येथील ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने मंगळवारी (दि.30) श्री हनुमान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दुपारी गावात जाऊन देवाचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गावकीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते आ.पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सकाळपासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.



सकाळी सात वाजता श्रींची आरती करून श्री हनुमान उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी भजनांचा कार्यक्रम घेण्यात आला. रात्री नऊनंतर श्रींची पालखी, मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसोबत भजन, किर्तन, बेंजोचा समावेश होता. यावेळी ज्येष्ठ मंडळींसह तरुणाई मोठया संख्येने सहभागी झाले होते. गावात ठिकठिकाणी पूजेच्या साहित्यांसह खाद्य पदार्थ, खेळणी, घरगूती साहित्यांची दुकाने सजली होती. उत्सवानिमित्त घोटवडे गावात दाखल झालेल्या अनेक भाविकांनी खरेदीचा आनंद लुटला. त्यामुळे गावात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. उत्सव आनंदात व मंगलमय वातावरणात साजरा करता यावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने समिती तयार करण्यात आली होती. समितीच्या पदाधिकारी, सभासदांनी चोखपणे भूमिका बजावत उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

Exit mobile version