वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून चेहर्‍यावर फुलवला आनंद

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांचा उपक्रम
| पनवेल | प्रतिनिधी |

पोलिस म्हटले की धवापळीचे जीवन. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असतात. स्वतःबरोबरच कुटुंबियांकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो. पण, नवी मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले स्वप्नील लाटे यांनी आपला वाढदिवस आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालय व साई आश्रय निराधार वृद्धाश्रमात शनिवारी साजरा केला आहे.

नवी मुंबई पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांचा शनिवारी 9 जुलै रोजी वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवस कोप्रोली येथील कै.रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना क्रिकेट खेळाचे साहित्य, तसेच भेटवस्तू देऊन त्याठिकाणी वाढदिवस साजरा केला त्याचबरोबर नवीन पनवेल येथील साई आश्रय या निराधार वृद्धाश्रमात साजरा केला. यावेळी तसेच निराधार वृद्ध, महिला, पुरुष यांना भेटवस्तू, फळे व मिठाईचे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱयावर आनंदाची झळक होती. यावेळी स्वप्नील लाटे यांना त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी साई आश्रय वृद्धाश्रमचे किरण पाटील, ज्योती पाटील, आदिवासी कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयाचे ललिता कुरुळकर, प्रफुल चुनेकर, मनोज कुरुळकर, यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत कुंभार, पत्रकार केवळ महाडिक, रवींद्र गायकवाड, संतोष आमले, अनुराग वाघचौरे हे उपस्थित होते.

Exit mobile version