फळमाशीमुळे हापूस होणार बॅन

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

आंबा व्यवसायावर तुडतुडे, थ्रीप्स, बुरशी, मिलीबग, फळमाशी इत्यादी संकटे उभी आहेत. त्यातील फळमाशी हा सर्वात मोठा शत्रू असून त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा हापूस बॅन होण्याची भिती आहे. त्यावर मात करण्यासाठी त्वरित पावलं उचलली पाहिजेत, असे मुंबईतील आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी केले.

देवगड येथे झालेल्या आंबा बागायतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हांडे यांनी शेतकर्‍यांसाठी पायाभूत सुविधा तसेच पॅकिंग, ग्रेडिंग, सॉटींग या बाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले. फळमाशी विरोधात विविध उपाय योजनांबद्दल विद्याधर जोशी, माजी आ. अजित गोगटे, संदिप कुलकर्णी यांनी माहिती दिली. 15 मे 2021 रोजी वादळी पाऊस झाला. त्यावेळी आंबा खाली पडला आणि त्यात फळमाशांनी प्रचंड प्रमाणात अंडी घातली. तीच अंडी 2022 मध्ये सक्रिय होऊन त्यांनी उच्छाद मांडला. फळमाशीचा आंबा निर्यात झाला व आखाती देशात बोंबाबोंब सुरू झाली. त्यामुळे हापूस बॅन होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

Exit mobile version