माथेरानमध्ये हर घर तिरंगा अभियान; मुख्याधिकार्‍यांचे आवाहन

| माथेरान | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित महर घर तिरंगा अभियान देश भारत सर्वत्र राबविण्यात येणार आहे. माथेरानमध्ये सुद्धा नगरपरिषदे मार्फत हा उपक्रम नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या अभियान राबविण्यात संदर्भात विचार विनिमय चर्चा व लोकसहभाग वाढविण्यासाठी माथेरान नगरीच्या उत्तम प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी अधीक्षक दीक्षांत देशपांडे, एपीआय शेखर लव्हे, माजी लोकप्रतिनिधी, शिक्षक वृंद, व्यापारी वर्ग, नगरपालिका कर्मचारी वर्ग यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महर घर तिरंगा हा उपक्रम देश भारत राबविला जाणार आहे.माथेरान मध्ये देखील या उपक्रमाच्या अनुषंगाने येथील लहान मुलांपासून सर्वांनाच देशाच्या स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.आणि ही संस्कृती रुजविण्यासाठीच महर घर तिरंगाफ अभियान राबविले जाणार आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग शासन परिपत्रकानुसार आणि सूचनांनुसार माथेरान नगरपरिषद हद्दीमध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने येथील माथेरानच्या उत्तम प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या अध्यक्षतेखाली विचार,विनिमय,चर्चा व लोकसहभाग वाढविण्यासाठीची बैठक येथील नगरपरिषदेच्या हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यावेळी माथेरान मधील लोकप्रतिनिधी पत्रकार मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version