| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर घर तिरंगाफ अभियानाचा सुरुवात केली. यावर्षी देखेली पंतप्रधानांनी करोडो भारतीयांना आवाहन केलं आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पीएम मोदी यांनी एक ट्विट केलं असून महर घर तिरंगाफ अभियानातंर्गत लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि याचा सेल्फी महर घर तिरंगाफ वेबसाईटवर अपलोड करावा असं आवाहन केलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राजधानी दिल्लीत महर घर तिरंगाफ बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली.