| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय जीवन वीम्यामधील उद्योगपती अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करून कोणतेही नुकसान झाले नसल्याचे एलआयसीचे प्रमुख सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले. एलआयसीवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी संसदेत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, एलआयसी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचे कौतुक केल्यापासून गुंतवणूकदार, पॉलिसीधारक आणि भागधारकांप्रती त्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व आणखी वाढले आहे.