तरुणीची छेडछाड करणे पडले महागात

अलिबाग स्थानकातील घटना

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग एसटी बसस्थानकात एका शाळकरी मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न एका 30 वर्षीय व्यक्तीने केला. त्याला स्थानिकांनी बेदम चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. तरुणीचे मोबाईलवर लपून फोटो काढत असल्याची माहिती समोर येत आहे.

अलिबाग एसटी स्थानकात बसची वाट पाहात असलेल्या शाळकरी मुलीचा एक 30 वर्षीय इसम त्याच्या मोबाईलवरून लपून फोटो काढत होता. ही बाब मुलीच्या व स्थानिकांच्या लक्षात आल्यावर स्थानिकांनी त्याला मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो बिहार राज्यातील असून, गेल्या चार दिवसांपूर्वी तो अलिबागमध्ये नोकरीसाठी आला होता. मोबाईलवरील सर्व फोटो डिलीट मारण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी करून पुन्हा सोडून दिल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version