हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करणार्‍या चौघांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नवर्‍यास सासरच्या मंडळींचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुंबई, लोअर परेल भागातील प्रयांका अमन जैन या तरुणीचे कर्जत शहरातील मारवाडी समाजातील तरुणांबरोबर 2018 मध्ये लग्न झाले. त्यानंतर नवर्‍याने परदेशात जायचे असल्याने माहेराहून पैसे आणण्यास सांगितले. मात्र पैशाची मागणी पूर्ण न केल्याने नणंदेने पिडित महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सासू-सासर्‍याकडूनही मारहाण केली जात होती. अखेर जाचाला कंटाळून पिडित महिलेने थेट माहेरचा रस्ता पकडला. तसेच पतीसह सासरच्या मंडळींकडून होणार्‍या जाचाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार जगताप अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version