| रसायनी | प्रतिनिधी |
मध्य रेल्वे आपटा रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यपदी हरेश साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र हरेश साठे यांना नुकताच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथील मंडळ कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक जितेंद्र यादव यांच्याकडून देण्यात आले आहे. मध्य रेल्वे आपटा रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यपदी हरेश साठे यांची ही निवड 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. आपटा रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे व त्यावर उपाययोजना करणे, सार्वजनिक हिताचा व सार्वजनिक सोयीचा कोणताही विषय, प्रवाशांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध बाबतीत ही रेल्वेची कमिटी कार्य करीत असते. अशा या महत्वपूर्ण कमिटीवर हरेश साठे यांची निवड झाली आहे.