। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ घाग हे रविवार (दि.31) मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. महिला कार्यशाळा सभागृहात हरिभाऊ घाग यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक व कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी त्यांची ढोल ताशांच्या गजरात ग्रामपंचायत ते श्री क्षेत्र भवानी गावदेवी मंदिर व गावच्या वेशीपासुन ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान असंख्य महिलांनी त्यांचे औक्षण केले.