वेणगाव | वार्ताहर |
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी मोठे वेणगाव येथील हरीश्चंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली. कोटींबे समाज मंदिरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाची सभा राष्ट्रीय महासचिव उमाकांत डोईफोडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.यावेऴी तालुक्याची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.यामध्ये सचिव-विनोद चव्हाण, सहसचिव-रमेश सातवे कोटींब,खजिनदार-मंगल सातवे, कार्याध्यक्ष – गजानन आबनांदे, उपाध्यक्ष-चंद्रकांत बोंबे, बाळकृष्ण कदम,कर्जत ता, युवक अध्यक्ष सौरभ नवले,गुंडगे,शहराध्यक्ष – हिरामण कदम -मुद्रे ,शहर सचिव – राहुल गायकवाड – गुंडगे ,आदी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. कोकण विभागीय अध्यक्ष गौतम बळवंते यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. या वेळी राजू नेटके,शैलेश मराठे,भाऊ वाघमारे,सुरेश गायकवाड, काशिनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.