हर्षल पाटील यांना मातृशोक


| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार हर्षल पाटील यांच्या मातोश्री वंदना सुर्यकांत पाटील यांचे सोमवारी (दि.29) दिर्घ आजाराने निधन झाले.

निधनासमयी त्या 61 वर्षाच्या होत्या. यांच्यावर अनेक महिन्यांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी (दि.29) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पेण येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मंगळवारी (दि.30) रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकिय, पोलीस, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वंदना पाटील यांचे दिवस कार्य रविवार (दि.11) फेब्रुवारी रोजी शिर्की येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती पाटील कुटूंबियांकडून देण्यात आली.

Exit mobile version