। अलिबाग । प्रतिनिधी ।
जय भवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अभय म्हामुणकर यांचे वडील भाऊराव जयराम म्हामुणकर यांचे शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी निधन झाले. निधनासमयी ते 76 वर्षांचे होते. रामनाथ येथील स्मशानभूमीत रविवार दि.29 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जयभवानी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. मिलिंद चव्हाण, हर्षल पाटील, बाळू पवार, नरेश सावंत, उल्हास पवार, अनिल गोळे, पाटणूस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. भाऊराव म्हामुणकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाऊराव म्हामुणकर यांचे दहावे सोमवारी (दि.7), तर उत्तरकार्य गुरुवारी (दि.10) होणार असल्याचे म्हामुणकर कुटुबियांकडून कळविण्यात आले आहे.