| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलकडे येथील हरिश्चंद्र यशवंत पाटील यांचे शनिवारी (दि.24) अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 62 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, भाऊ, नातवंडे, पुतणे, सुना असा परिवार आहे.
हरिश्चंद्र पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचा राजकारणासह समाजकार्यात सक्रीय सहभाग होता. बेलकडे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी अगदी सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. गावात होणाऱ्या नाटकांमध्ये त्यांचा सहभाग होता. सतत हसतमुख असणारे सामाजिक कार्यात तत्पर असणारे असे मनमिळावू व्यक्तिमत्व होते. शनिवारी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल बेलकडे गावासह सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दशक्रिया विधी सोमवारी (दि.02) बेलकडे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली.