| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |
दादर शिवाजी पार्क जिमखानातर्फे 10 व्या प्रभाकर खानोलकर स्मृती सहाय्यक प्रशिक्षक आणि मार्करसाठींच्या दुहेरीच्या टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजय गिरी आणि भावेश नवलू जोडीने विजेतेपद पटकावले. या जोडीचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. तर, विक्रम कोरगांवकर आणि आकाश कोरगांवकर जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत देशभरातून सहाय्यक प्रशिक्षक आणि मार्कर्स सहभागी झाले होते. अंतिम सामना विजय गिरी-भावेश नावलू जोडीने 6-1 असा जिंकला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवाजी पार्क जिमखान्याचे सर चिटणीस संजीव खानोलकर आणि सहाय्यक चिटणीस सुनील रामचंद्रन यांचे हस्ते झाला. विजेत्या विजय गिरी आणि भावेश नावलू जोडीला 30 हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले. यावेळी जिमखान्याचे विश्वस्त प्रकाश नायक, टेनिस विभागाचे चिटणीस योगेश परूळेकर, इन्डोअर विभागाचे चिटणीस सनील समेळ तसेच चंद्रकांत राऊत आणि जितू केवलानी आदी उपस्थित होते. तसेच, या स्पर्धेचे आयोजन टेनिस खेळाचे प्रशिक्षक संजीय पटेल यांनी केले. तर, प्रभाकर खानोलकर यांचे नातू आणि उद्योजक संकेत खानोलकर हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.







