| पाताळगंगा | वार्ताहर |
सध्या सर्वत्र शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या हाताला कोठेच काम मिळेनासे होत असल्यामुळे पावसाळ्यात निर्माण झालेले गवत आदिवासींना रोजगार मिळून देत आहे. ग्रामीण भागात शेतजमिनीशिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करीत असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात तयार होणार्या गवतामुळे आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न सुटत असतो. सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहेत. शहरातील मोठे तबेलेवाले व इतर व्यक्ती मोठ्या प्रमाणात गवताची खरेदी करत असून, यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे, असे मत आदिवासी बांधवांनी व्यक्त केले.