| नवीन पनवेल | वार्ताहर |
कारला विद्यार्थी घेऊन जाणार्या बसचा धक्का लागल्याने कारचालकाने शिवीगाळ करत लाकडी बांबूने बस चालकाला मारहाण केली. यात बस चालक जखमी झाला आहे.
सुधीर मोरे हे बसमध्ये सेंट जोसेफ नवीन पनवेल येथील विद्यार्थी बसमध्ये घेऊन त्यांना घराजवळ कामोठे परिसरात सोडण्यासाठी निघाले. बस विद्यार्थ्यांसह किया शोरूम जवळ आली असता कारच्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार उजव्या बाजूला घेतल्याने बसचा पुढील भाग त्याच्या कारच्या मागील बाजूला घासला गेला. यावेळी कारचालक शिवीगाळ करत धमकी देऊ लागला. बस चालक कामोठेकडे जाण्यासाठी निघाले असता कार चालकाने पाठलाग केला आणि बस विद्यार्थिनीला सोडण्यासाठी थांबवली असता त्याने कार बसच्या समोर थांबवली आणि लाकडी बांबूने मारण्यासाठी गाडीच्या दिशेने धावत आला. सुधीर मोरे यांना गाडी बाहेर खेचून त्यांना लाकडी बांबूने मारहाण केली. यात सुधीर मोरे जखमी झाले. यावेळी मोरे यांची मुलगी मदतीसाठी धावून आली असता कारचालक तेथून पळून गेला.