जांबरुंग येथे आरोग्य शिबीर

| कर्जत | प्रतिनिधी |
मुंबई येथील ज्योविस आयुर्वेद कडून तालुक्यातील जांबरुंग येथे आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्योविस आयुर्वेदचे कर्जत तालुक्यातील पाचवे शिबीर यशस्वी झाले. यावेळी 151 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून तालुक्याच्या विविध भागातील रुग्ण तपासणीसाठी आले होते. नारी सामाजिक संस्थेकडून रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जांबरुंग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आयुर्वेदिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आ.स्व तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान यांच्या वतीने ज्योविस आयुर्वेद, नारी सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने जांबरुंग कामतपाडा येथील कल्की सोशल वेल्फेअर ट्रस्ट आणि मैत्री बोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित शिबिराचे उद्घाटन सरपंच दत्तात्रय पिंपरकर आणि माजी सरपंच विश्‍वनाथ घुडे यांचे हस्ते झाले. यावेळी डोंबिवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. अरुण पाटील, डॉ. अंजली पाटील, कल्की ट्रस्टचे राहुल मेहता, दौलत देशमुख, माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे मुकेश सुर्वे, मनीषा सुर्वे आदी उपस्थित होते.

मुकेश सुर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. राज सातपुते यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. अरुण पाटील, रायगड जिल्हा परिषद शाळा जांबरुंग, कल्की तेजोमय सोशल वेल्फेअर ट्रस्ट चा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वसंत मोधळे, छगन ओसवाल, पांडुरंग देशमुख, ज्योती पाटील, सानिका सावंत, बबन चव्हाण, नरेश घुडे, सुनील पोखरकर, उत्तम हरपुडे, हिरामण माने, जगदीश ऐनकर, संतोष नानोटे आदी उपस्थित होते.

Exit mobile version