कशेळे येथे आरोग्य शिबीर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आरोग्य संजीवनी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात तालुक्यातील कशेळे येथे आरोग्य शिबिराने करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य संजीवनी अभियानाला सुरुवात झाली असून, या शिबिरात 103 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

कशेळे येथील भवानी माता मंदिरात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते झाले. या शिबिरात 103 रुग्णांची आरोग्य तपासणी कल्याण येथील आतुर हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाने केली. डॉ. सागर रोकडे, डॉ. वर्षा बॉम्बे आणि आरोग्य कर्मचारी यांनी शिबिरासाठी आलेल्या रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, इसीजी, तसेच हृदय रोगासंबंधी तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्याबाबत तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून, आवश्यक रुगांवर कल्याण येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, बाजीराव दळवी, अविनाश भासे, योगेश दाभाडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version