| दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे रविवारी संजीवनी सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले. ठाणे येथील साई हॉस्पिटल यांनी या शिबिरात आरोग्य तपासणी केली.
या शिबिरात वैद्यकीय अधिकार्यांनी रक्तदाब तपासणी सह डायबिटीस, ईसीजी, हृदयविकार, अस्थिव्यंग, सामान्य विकार आदी तपासण्या करण्यात आल्या. यामधील एनजीओग्राफी साठीच्या पुढील उपचारासाठी अठरा रुग्णांना पुढे पाठवण्यात येणार आहेत असल्याचे सांगितले. या शिबिरासाठी जय हॉस्पिटल ठाणे येथील डॉ. जयंत गावंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच उर्वरित तपासणीसाठी साई हॉस्पिटल डोंबिवली येथील डॉ. अजित कोरडे व त्यांचे सहकारी यांचे सुद्धा सहकार्य लाभले. श्री. मोहनलाल सोनी विद्यालयच्या परिसरात हे शिबीर घेण्यात आले. रुग्णांना औषधे देखील मोफत देण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी मीना गाणेकर, प्रदीप खोपकर, लीलाधर खोत मसुद दर्जी कुमार गाणेकर, चंद्रकांत पाटील, महेश चौलकर, नवनाथ कांबळे, विजेश कांबळे रफिक जहागीरदार, नुहजत जहागीरदार, प्रताप पाटील, जयवंत कांबळे, योगेश बिराडी, दीपक कांबळे, संदेश गाणेकर. मनोज चौलकर, प्रतीक्षा चौलकर, प्रमोद कांबळे आणि सुकुमार चौलकर व संदीप भायदे यांनी विशेष मेहनत घेतली.