| उरण | वार्ताहर |
उरण नगर परिषद कार्यालय येथे सफाई कामगार तसेच सर्व कर्मचारी यांच्या करिता महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या प्रोप्रायटर डॉ. नयना ठाकूर यांच्या सौजन्याने आणि वुई क्लब उरण, म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन आणि शुश्रूशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्र चिकित्सक तज्ञ डॉ तात्यासाहेब लहाने उपस्थित होते.
या शिबिराचे उद्घाटन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संतोष पवार, डॉ. बी. एम. कालेल, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. ईटकरे, नरेश रहाळकर, रवी भोईर, आरती भाटिया, श्रीमती जैन, श्रीमती काटदरे, अनिल जगधनी, मधुकर भोईर, सागर चौकार, हरेश जाधव, धनेश कासारे, दत्ता मोरे, नरेश पावसकर, धनंजय आंब्रे, विशाल गायकवाड सह सफाई कामगार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.