कारागृहात बंद्यांसाठी आरोग्य शिबीर

| अलिबाग | वार्ताहार |

प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व जिल्हा कारागृह अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने अलिबाग कारागृहातील बंद्यांसाठी योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई व डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शनाखाली 01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त 29 डिसेंबर रोजी आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 94 बंद्यांची आरोग्य व रक्त तपासणी करण्यात आली.

यावेळी संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांनी एचआयव्ही/एड्स तसेच गुप्तरोग या आजाराबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ. मितेश पाटील यांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र रणनवरे, तुरुंग अधिकारी किशोर वारगे, शशिकांत निकम व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

लायन्स क्लब श्रीबागच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. कला पाटील यांनी बंद्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरिता गाण्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष संजय रावले, प्रियदर्शिनी संजय पाटील, विद्याधर पैठणकर, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता तुळपुळे, अर्चना जाधव, सचिन जाधव, गणेश सुतार, सत्यनारायण इंगळे, जुईली पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र रणनवरे यांनी केले.

Exit mobile version