विहुर आदिवासी वाडी येथे आरोग्य शिबिर संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या मुरुड तालुका टीम रायगड यांच्या विद्यमाने नियोजित कार्यक्रम विहुर आदिवासी वाडी आरोग्य शिबिर व मोफत औषधे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात विशेष सहकार्य डॉ. मयुर कल्याणी, डॉ. अमित बेनकर, डॉ. हितेश जैन व डॉ. संजय पाटील यांनी केले. तसेच या शिबिरासाठी विहुर येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाची संकल्पना व विशेष मार्गदर्शन नॅशनल चिफ सेक्रेटरी धनंजय म्हात्रे यांची असून कार्यक्रमासाठी नॅशनल चिफ सेक्रेटरी धनंजय म्हात्रे व डिस्ट्रिक्ट चेअरपरसन प्रिया कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुरुड तालुक्यातील सर्व सक्रीय पदाधिकारी व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version