। नागोठणे । प्रतिनिधी ।
भटके विमुक्त दिनाच्या निमित्ताने नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेत ३१ ऑगस्ट रोजी आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कॅन्सर तज्ज डॉ. प्रणिता डोंगरगावकर, मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ. कपिल चावरे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शुभांशू भालादरे आणि नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांना आरोग्य शिबिरात निमंत्रित करण्यात आले आहे. हे रोगनिदान शिबीर सर्वासाठी खुले आणि निशुल्क असल्याने या शिबिराचा नागोठण्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या दिनानिमित्त भटक्या-विमुक्त जाती जमातीच्या संवर्गाच्या सामाजिक आणि शैक्षणिक समस्या आणि संविधानिक तरतुदी व भवितव्य या विषयावर ॲड. मानवेंद्र वैदू यांचे व्याख्यानही यावेळी होणार आहे. तसेच, भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाळेच्या वतीने नवनाथ डोंगरगावकर यांनी केले आहे.







