धडक मोहिमेंतर्गत चिखली येथे आरोग्य तपासणी शिबीर

एकात्मिक बालविकास सेवा योजना अलिबाग व प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांचा स्तुत्य उपक्रम
कुसुंबळे | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे धडक मोहिमेंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना अलिबाग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांच्या प्रयत्नाने नुकतेच चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर संपन्न झाले.
चिखली विभागातील कमी वजनाच्या तसेच सर्वसाधारण अशा 0 ते 6 वर्षे वयोगटातील जवळ जवळ 50 मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. यावेळी पालकवर्गदेखील उपस्थित होता. यावेळी किरकोळ आजारी व दुर्धर आढळणार्‍या बालकांना ओषधोपचार देण्यात आले. यावेळी सर्व मुलांचे वैद्यकीय अधिकार्‍यांसमोर प्रत्यक्ष वजन, उंची, दंडघेर घेण्यात आले तसेच पल्स ऑक्सिमिटरने पल्स रेट, एसपीओटू व टेंप्रेचर मशीनने टेंप्रेचर तपासण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, तसेच वैद्यकीय अधिकारी ओदुंबर कोळी यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यिका सरोज पाटील, आरोग्य सेविका सुनिता पाटील, आरोग्य सहाय्यक प्रदीप पाटील, आरोग्य सहाय्यक मनोज पाटील तसेच समस्त अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version