श्रीगाणवाडी येथील रुग्णांची आरोग्य तपासणी ; चष्म्यांचे वाटप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबागमधील सिकलसेल विभागाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडी येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत नेत्रतपासणी, दंत चिकित्सा व विविध शारीरिक समस्या विषयी तपासणी तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली. सदर आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने सर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले होते.

नेत्र विभागाच्या तपासणीनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, नेत्र चिकित्सक डॉ. गोमसाळे, डॉ. अजय इंगळे, डॉ. खानावकर,सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर, साहिल म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात दोन लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिराकरिता जिल्हा रूग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. महालिंग क्षीरसागर, आरोग्य उपकेंद्र खिडकीचे उकज डॉ. अनिकेत म्हात्रे, दंत चिकित्सक डॉ. नवीना ठाकूर,साहिल म्हात्रे, सुशील साईकर, हितेश जाधव, ज्ञानदीप भोईर, प्रतिम सुतार,मुख्याध्यापक ठाकूर आदी पस्थित होते.

सुशील साईकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महालिंग क्षीरसागर, हितेश जाधव, ज्ञानदीप भोईर, प्रतिम सुतार यांनी विविध आजार आणि उपचार यांची माहिती दिली. मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले. शिबीर यशस्वी करण्याकरिता नेहरू युवा केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या तैसीन छापेकर, शुभांगी मोकल, कल्पित कोळी आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version