वडगाव शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

| रसायनी | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा शासकीय रुग्णालय, अलिबागच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र अलिबाग येथील एएनएम आणि जीएनएमच्या विद्यार्थिनींचे ग्रामीण आरोग्य अनुभव शिबीर रसायनी पाताळगंगा येथील लोहोप आरोग्य उपकेंद्रात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि.11) रा.जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, बीएमआयएस व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यात आरोग्य विषयक चांगल्या सवयी, घ्यावयाची काळजी तसेच किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना स्वच्छता व शारीरिक बदल तसेच घ्यावयाची दक्षता व मासिक पाळी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता जिल्हा रुग्णालय रायगड, अलिबागच्या अधिसेविका गायत्री म्हात्रे व परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय रायगड, अलिबागच्या परिचर्या अधिकारी सारिका पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाकरिता पाठ्यनिर्देशिका धनश्री पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुभाष राठोड व इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते व जी.एन. एम. तृतीय वर्ष विद्यार्थिनी परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version