डेक्कन जिमखाना येथे आरोग्य तपासणी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. आरोग्य आणि रक्तदान शिबिरात 47 रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या आरोग्य पथकाच्या सहकार्याने डेक्कन जिमखाना मित्रमंडळ आणि गुरु गजानन प्रासादिक भजन मंडळ यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन केले होते.

डेक्कन जिमखाना येथील श्री गुरुदत्त मंदिरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन दिलीप आंबवणे, प्रसादबुवा पाटील, महेंद्र चंदन, माजी नगरसेवक मुकेश पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, तसेच टिलराज विचारे, समीर चव्हाण, प्रशांत चंदन आदींच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. विद्या कान्हेरे, डॉ. अभिषेक काळे, डॉ. सोनाली चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी सुनील देशमुख, सुनील आंबवणे, कौशिक वांजळे, रवींद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे हातभार लागले.

Exit mobile version