पोलीस बांधवासाठी आरोग्य तपासणी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे पोलीस बांधवासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याला पोलीस बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पनवेल तालुका पोलीस ठाणे आवारात पनवेल म.न.पा आरोग्य विभाग यांचे वतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यत आले होते. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विविध चाचण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच यावेळी त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व औषधे सुद्धा देण्यात आले. या आरोग्य शिबिराला पोलीस बांधवानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Exit mobile version