लायन्स क्लब मांडवातर्फे महाआरोग्य शिबिरात 550 जणांची आरोग्य तपासणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

लायन्स क्लब मांडवाचा ऑक्टोबर सेवा सप्ताह सुरु आहे, त्यानिमित्त रविवार (दि.2) महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे येथे लायन्स क्लब मांडवाने अमित नाईक पुरस्कृत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 550 हून अधिक जणांची आरोग्य तपासणीसह तसेच औषधोपचार करण्यात आले.

लायन्स क्लब मांडवाच्या या महाआरोग्य शिबीर अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन आणि जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्या सहकार्य लाभले. या महाआरोग्य शिबीरप्रसंगी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, प्रदीप सिनकर, महेश मोघे, अरविंद घरत, बी.एन. कोळी, अभिजीत गुरव, सुमीत पाटील, विलास पाटील, अमित नाईक, अमिश शिरगावकर, मोहन पाटील, धवल राऊत, जितेंद्र ठाकूर, सुबोध राऊत, डॉ.राजाराम हुलवान, विद्या अधिकारी, जितेश्री ठाकूर, अनिल म्हात्रे, नयन कवळे, महेंद्र पाटील, दीपक गाटे, डॉ. सुरेश म्हात्रे आदी लायन परिवार उपस्थित होता. तसेच डॉ. मेघा घाटे, अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, डॉ. राहुल शर्मा आदींसह 25 डॉक्टर्स आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते.

या महाआरोग्य शिबिरात मधुमेह व नेत्रतपासणी करण्यात आली. 50 जणांना मोतीबिंदू आढळून आला, त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात येणार आहे. तसेच अस्थिरोग, बोनडेन्सीटी, इसीजी आदी तपासण्या व औषधोपचार करण्यात आले. प्रारंभी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे नितीन अधिकारी यांनी प्रास्ताविकात या शिबिराची माहिती दिली. लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष बी.एन. कोळी यांनी ऑक्टोबर सेवा सप्ताहाबाबत माहिती दिली. अमित नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.

Exit mobile version