एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

माणुसकी प्रतिष्ठान व अलिबाग एसटी बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य व नेत्रतपासणी तसेच व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अलिबाग आगारात हा कार्यक्रम रविवारी 13 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.

या शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जयवंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, अस्थीरोग तज्ज्ञ राहुल शर्मा, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ स्वामी, निवृत्त कृषी अधिकारी दिलीपकुमार भड, डॉ. कल्पेश थळे, संदीप वारगे, सुप्रिया जेधे, अमेय ढोरे, शिवम मिसवाह यांच्यासह अलिबाग एसटी बस आगारातील आगार व्यवस्थापक व एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात 64 हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी केली. तसेच व्यसनाच्या आहारी गेल्याने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

Exit mobile version