| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे शहर व ग्रामीण परिसरात सातत्याने वेगवेगळे व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणा-या नागोठणे लायन्स क्लब तर्फे बुधवार दि 2 डिसेंबर रोजी आरोग्य मार्गदर्शन व अन्नदान कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला. या कार्यक्रमात नागोठणे व पंचक्रोशी तसेच रोहा तालुक्यातील आशा सेविका यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन वैद्य एमजेएफ लायन यशवंत चित्रे यांनी केले. आशा सेविका , प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सर्व स्टाफ व अधिकारी यांना स्नेहभोजन देवून अन्नदान हा महत्वपुर्ण कार्यक्रम करण्यात आला. चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन उर्फ घिसुशेठ जैन यांच्या मार्फत अन्नदान करण्यात आले.
विवेक सुभेकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अनिल गीते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आभार मानले. यावेळी डॉ.आदित्य सिरसाट, आर.डी. हंबीर ,वंदन तांबोळी, संतोष शहासने,सुजाता जवके,श्वेता सुभेकर श्रीकृष्ण पॅथॉलॉजीचे संपुर्ण स्टाफ यांची मोलाच सहकार्य लाभले.