शुश्रूषा हार्ट केअरतर्फे उपक्रम
। नवी मुंबई । वार्ताहर ।
रिक्षाचालक हा सर्वच शहरातील एक महत्वाचा घटक आहे. नागरिकांना आपल्या इच्छुक स्थळी पोहचविण्यासाठी रिक्षा चालक हे सदैव तत्पर असतात. परंतु हेच रिक्षाचालक स्वतःच्या आरोग्यविषयी तितके जागरूक नसल्याचे नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निरीक्षण आले आहे. नुकताच साजरा झालेल्या जागतिक हृदयदिनानिमित्ताने नेरुळ येथील रिक्षाचालकांसाठी एक अनोखा उपक्रम आयोजित केला होता.
उपक्रमार्तगत रिक्षाचालकांना मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी स्मायली बॉल चे वाटप करण्यात आले तसेच हृदयविकार असलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणताना व घरी नेताना कशी काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.