कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

जि.प. सीईओंच्या उपाययोजना करण्याच्या सूचना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमिक्रॉन आणि कोरोनाबाधितांची ही वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. सद्यःस्थितीत रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या व पॉझिटिव्हीटी रेट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधांची वाढ व उपलब्धता करणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही कोरोनाचा होणार प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, एकमेकांसोबत बोलताना सामाजिक अंतर पाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटाईझरने वारंवार हात स्वच्छ करावेत, प्रतिबंधात्मक लसीकरण डोस घ्यावेत, कोरोनाची लक्षणे असल्यास वेळीच तपासणी करून घ्यावी, सरकारने सुचविलेल्या सर्व उपाययोजना तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

काय आहेत सूचना!

Exit mobile version