। पाली । वार्ताहर ।
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात शुक्रवारी (दि.6) पावसाने विजांच्या गडगडांसह बरसायला सुरुवात केली.
पालीत दुपारनंतर पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची पुरता धांदल उडाली. मोटारसायकल वर घराबाहेर पडलेल्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी छताचा आधार घ्यावा लागला. गेली काही दिवसांपासून सुधागडाच्या काही भागात तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. वातावरणात देखील बदल होत असून काही दिवसांपासून उकाडा देखील वाढला आहे. परंतु, शुक्रवारी पावसाने केलेल्या जोरदार सुरुवातीमुळे नागरिकांना उकाड्यापासून तुर्तास दिलासा मिळाला. शेतकर्यांची पावसाळ्यापूर्वीची शेती मशागतीची कामे देखील अपूर्णच आहेत. मात्र, आता पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे कामाला देखील वेग येत आहे.