| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता या आठवड्यात सक्रिय होईल. राज्यातील काही भागांत पुढील दोन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 24 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. रायगडला 24 आणि 25 ऑगस्टला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यासाठी 25 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ हवामान आणि हलका ते मध्यम मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.