| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील पीरडोंगरी आणि फणसडोंगरी या भागांमध्ये दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसामुळे संरक्षण भिंत खचून ती पडली आहे त्यामुळे संतोष शेडगे आणि भास्कर झोरे या दोघांच्याही घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
संरक्षण भिंत खचल्याची समजतात पेण नगरपालिकेचे ओएस राजाराम नरुटे आणि बांधकाम अभियंता विनायक बनसोडे घटनास्थळी पोहोचले आणि बाधित कुटुंबियांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे . ही दोन्ही कुटुंब पेणमधील शाळा क्रमांक चार आंबेडकर शाळेमध्ये यांचे स्थलांतरित करण्यात आले आहे.
दोन्ही कुटुंबियांना नगरपालिकेकडून जास्तीत जास्त कशी मदत होईल यासाठी स्थानिक तरुण भूषण कडू हे स्वतः प्रयत्न करत आहेत