| पुणे | प्रतिनिधी |
गणेशोत्सव काही तासांवर आला असतानाच हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजाने गणेशभक्तांच्या आनंदावर पाणी पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सवाचे पहिले दोन दिवस पावसाचे असणार आहेत. कोकण, गोवा आणि विदर्भात 4 ते 10 सप्टेंबर दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातील काही भागात 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात 5 सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची शक्यता शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.