भुंडया पुलावरून अवजड वाहतुक सुरूच

| पेण | प्रतिनिधी |

पेणची ऐतिहासिक ठेव असणारा भुंडापुल हा कमकुवत झालेला असताना देखील त्यावरुन अवजड वाहनांची वाहतुक मोठया प्रमाणात सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे या भुंडया पुलाच्या दोन्ही बाजुला सुचना फलक लावले आहेत. शहराच्या बाजुने सार्वजनिक बांधकाम खात्याने तर दुसर्‍या बाजुने ग्रामपंचायत तरणखोप कडून अवजड वाहने नेण्यास सक्त मनाई असल्याचे सुचना फलक लावले असून देखील वाहन चालक बिंधास्तपणे आपली वाहने भुंडया पुलावरून नेत आहेत. त्यामुळे अगोदरच कमकुवत झालेला भुंडापुल केव्हाही कोलमडून पडू शकतो. भुंडापुल म्हणजे पेणच्या इतिहासातील एक अनमोल ठेव आहे. मात्र, अवजड वाहन गेल्याने हा ठेवा नामशेष होउ शकतो, म्हणूनच प्रशासनाने योग्य ती खबरदारी वेळेस या अवजड वाहन नेणार्‍यांविरुध्द कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा हा पुल कोसळल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version