। पनवेल । वार्ताहर ।
सायन-पनवेल महामार्गांवर रस्त्याच्या मधोमध अवजड वाहने उभी केली जात आहेत. यापुर्वी कामोठे टोल नाक्यापुढे उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनांमुळे एका दुचाकीस्वाराचा जीव गेल्याची घटना घडलेली असताना वाहतूक विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे वाहतूक विभागाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
महामार्गांवरून प्रवास करताना शक्यतो मार्गाच्या कडेला वाहन उभी करावीत, असा नियम आहे. मधोमध वाहन उभी केल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारचा नियम पाळण्याच्या सूचना वाहनचालकांना वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कामोठे टोलनाक्यावर मात्र हा नियम पायदळी तुडवण्यात येत असल्याने वाहतूक विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेऊन मधोमध वाहने उभी करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
अवजड वाहने अपघाताला आमंत्रण
