रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे हेल्मेट रॅली संपन्न

| उरण | वार्ताहर |

रस्ता सुरक्षा हि काळाची गरज असुन जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षतेचे विषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. त्याचप्रमाणे उरण येथील वाढत असलेली वाहनसंख्या पहाता रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी बुधवारी (दि.7)रोजी मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरची रॅली केअर पॉईंट नाका, बोकडवीरा, द्रोणगिरी कॉलनी, नविन शेवा अशी काढुन केअर पॉईंट येथे सांगता करण्यात आली. मोटार सायकल हेल्मेट रॅलीमध्ये महिला व पुरुष अशा 61 मोटार सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता. सदरच्या रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्यावरुन येणा-या बिना हेल्मेट वाहन चालविणा-या मोटार सायकल स्वारांना गुलाबाचे फुल देऊन हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षतेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे मोटार वाहन निरीक्षक प्रविण बाबर, विकास मालवे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशोक वारे, महेश माने, व त्यांचे सहकारी तसेच श्रीएकवीरा मोटार ट्रेनिंग स्कुलचे संस्थापक बळीराम ठाकुर, जितेंद्र प्रधान, दानिश मुकरी, प्रितम पाटील आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version